S M L

दोन लाख अंगणवाडी सेविकांचा बेमुदत संपाचा इशारा

Sonali Deshpande | Updated On: Mar 17, 2017 03:11 PM IST

दोन लाख अंगणवाडी सेविकांचा बेमुदत संपाचा इशारा

17 मार्च : येत्या १ एप्रिलपासून राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविकांनी बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीनं आता या अंगणवाडी सेविकांच्या वेगवेगळ्या मागण्यांवर आक्रमक होण्याचा इशारा दिला आहे.

राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांचं मानधन इतर राज्यांच्या मानानं अत्यल्प असल्यानं ते वाढवून देण्यात यावं अशी या अंगणवाडी सेविकांची प्रमुख मागणी आहे. याबद्दल सरकारनं नेमलेल्या समितीचा अहवाल सरकारला मिळाला असून तो मान्य करण्यात यावा अशी देखील मागणी करण्यात आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठांनी अंगणवाडी सेविका या स्वयंसेविका नसून त्या कर्मचारी आहेत, असा निर्णय दिला होता. त्यानुसार त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा यासह इतर मागण्या या अधिवेशनात पूर्ण न झाल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा समितीनं दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 17, 2017 03:11 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close