... इथला शेतकरी शेतकरी नाही का? - धनंजय मुंडे

... इथला शेतकरी शेतकरी नाही का? - धनंजय मुंडे

  • Share this:

Dhanajay_vikhe

17 मार्च : उत्तरप्रदेशमधील मतदारांनी मतदान केले म्हणून तिथल्या शेतकरी हे शेतकरी ठरतात. पण अडीच वर्षांपूर्वी मतदान करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना भाजपने वाऱ्यावर सोडले असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी फडणवीस सरकारवर केला आहे. त्याचबरोबर,  राज्यात पुन्हा दुष्काळ पडणार नाही याची खात्री सरकार देणार असेल तर आम्हीदेखील कर्जमाफी झाल्यावर शेतकरी आत्महत्या होणार नाही याची हमी द्यायला तयार आहोत, असं सडेतोड प्रत्युत्तर धनंजय मुंडे यांनी सरकारला दिलं आहे.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवरुन नवव्या दिवशीही विरोधक आक्रमक होते. दुपारपर्यंत दोन वेळा सभागृहाचे कामकाज तहकूब करावं लागलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (गुरुवारी) कर्जमाफीच्या मागणीवर विधानसभेत निवेदन केलं. 2009 मध्ये राज्य सरकारने कर्जमाफी केली. पण कर्जमाफी केल्यानंतरच्या 5 वर्षात 16 हजार आत्महत्या झाल्या. त्यामुळे आता पुन्हा कर्जमाफी केल्यावर शेतकरी आत्महत्या करणार नाही याची हमी विरोधक देणार का? असा प्रश्नच मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना विचारला होता. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा आज विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी समाचार घेतला. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिलेले उत्तर दिशाभूल करणारं आहे. सरकार जर पुन्हा दुष्काळ पडणार नाही याची हमी देणार असेल तर विरोधकही शेतकरी पुन्हा आत्महत्या करणार नाही याची हमी द्यायला तयार आहेत असं आव्हानच त्यांनी दिलं आहे.

विधीमंडळातील प्रत्येक आमदाराची नाळ शेतीशी जोडलेली आहे. मुख्यमंत्री विरोधी पक्षांना प्रश्न विचारतात. पण विद्यमान सरकारने शेतमालाला हमी भाव ५० टक्क्यांनी वाढवून दिला शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नसती असेही त्यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 17, 2017, 1:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading