कर्मचाऱ्यांच्या वेतन प्रश्नी बेस्ट वर्कर्स युनियन आंदोलनाच्या पवित्र्यात

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Mar 17, 2017 02:58 PM IST

कर्मचाऱ्यांच्या वेतन प्रश्नी बेस्ट वर्कर्स युनियन आंदोलनाच्या पवित्र्यात

best buses

17 मार्च : बेस्टच्या कर्मचाऱ्यांचं वेतन थकवल्याविरोधात शशांक राव यांची बेस्ट वर्कर्स युनियन आता आक्रमक झाली आहे. आजपासून तीन दिवसात जर कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी न लावल्यास आक्रमकपणे आंदोलन करण्याचा इशारा या संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

याबद्दलची प्रतिक्रिया या संघटनेचे सचिव अरविंद कागिनकर यांनी आयबीएन लोकमतला दिली आहे. 'एकीकडे शिवसेना राज्य सरकारकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या असं म्हणतेय, पण दुसरीकडे बेस्ट कामगारांचे पगार थकवले जातायत,' हा दुटप्पीपणा असल्याची टीका कागिनकर यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 17, 2017 02:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...