दिल्लीत धोनी उतरलेल्या हॉटेलमध्ये आग, आगीत क्रिकेट किट जळून खाक

दिल्लीत धोनी उतरलेल्या हॉटेलमध्ये आग, आगीत क्रिकेट किट जळून खाक

  • Share this:

dhoni1231

17 मार्च :  टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि त्याचे झारखंड संघातील सहकारी राहत असलेल्या दिल्लीतील द्वारका परिसरातील हॉटेलमध्ये आग लागल्यानं एकच खळबळ उडाली आहे. धोनीसह सर्वांनाच सुखरूप बाहेर काढण्यात आलंय असून  आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र,  या आगीमध्ये धोनी आणि झारखंड संघातील इतर खेळाडूंचे क्रिकेटचे कीट पूर्णत: जळून खाक झाले.

विजय हजारे चषक स्पर्धेतील उपांत्य सामना आजपासून सुरू होणार होता. झारखंड विरुद्ध बंगाल यांच्यात ही अटीतटीची लढाई होणार होती. दिल्लीतील द्वारका परिसरात वेलकम नावाचे हॉटेल असून या हॉटेलमध्ये महेंद्रस सिंह धोनी उतरला होता. धोनीसोबत झारखंडची संपूर्ण टीमही याच हॉटेलमध्ये थांबली होती. तिथेच आज पहाटे अचानक आग लागली. पण आगीत टीमची किट जळून खाक झाली. त्यामुळे मॅच पुढे ढकलण्यात आल्याचं समजते.

दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 17, 2017 10:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading