S M L

कर्जमाफीसाठी भाजप-सेनेच्या शिष्टमंडळचं दिल्ली दरबारी गाऱ्हाणं

Samruddha Bhambure | Updated On: Mar 17, 2017 02:23 PM IST

कर्जमाफीसाठी भाजप-सेनेच्या शिष्टमंडळचं दिल्ली दरबारी गाऱ्हाणं

Mumbai: Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis during a press conference with Shiv Sena leaders Subhas Desai and Divakar Ravate in Mumbai, on Dec 4, 2014. (Photo: Sandeep Mahankal/IANS)

17 मार्च :  महाराष्ट्राच्या कर्जमाफीचा मुद्दा आता दिल्ली दरबारी दाखल होणार आहे. कारण भाजप-सेनेचं एक शिष्टमंडळ आज दिल्लीत जाणार असून केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली आणि केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंह यांचीही भेट घेणार आहेत. पंतप्रधानांच्या भेटीचे प्रयत्न केले जाणार आहेत पण त्यांची भेट होण्याची शक्यता धूसर असल्याचं समजतंय. दुसरीकडे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शुक्रवारी दिल्लीत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेणार आहे. राष्ट्रपती भवनात दुपारी ही भेट होणार असून उद्धव ठाकरेंची ही सदीच्छा भेट असल्याचे सूत्रांकडून समजते.

राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा अधिकच तापू लागला असताना आणि सत्ताधारी भाजपवर दबाव आणण्यासाठी विरोधी पक्षांच्या मागणीत शिवसेनेनेही आवाज मिसळला असतानाच, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत राज्य सरकारचे केंद्राकडेच लक्ष असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत दिले. ‘शेतकऱ्यांच्या पाठीशी आपले सरकार भक्कमपणे उभे आहे’, असा दिलासा देतानाच, शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी राज्याच्या शिष्टमंडळामार्फत केंद्रीय अर्थमंत्री आणि कृष‌मिंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ माजला असतानाच मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत निवेदन केलं. पण कर्जमाफीची धोषणा कीह केली नाही. कर्जमाफीसाठी आम्ही तयार आहोत, पण त्याचा फायदा बँकांना न होता शेतकऱ्यांनाच झाला पाहिजे, असा आक्रमक पवित्रा मुख्यमंत्र्यांनी घेतला. एवढंच नाहीतर कर्जमाफी केलीतर आत्महत्या थांबतील याची हमी विरोधक घेणार का, असा खडा सवालच मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. तसंच मुख्यमंत्र्यांनी यावेळी काँग्रेस सरकारच्या काळातली आकडेवारी विरोधकांच्या तोंडावर फेकत आपल्या कार्यकाळातली 7 हजारहून अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत चकार शब्दही उच्चारला नाही.

दरम्यान,  शेतकरी कर्जमाफीची मागणी मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावल्यांतरही शिवसेना आपल्या मागणीवर ठाम आहे. कर्जमाफीबाबतच केंद्रात कोणाशीही चर्चा करा, काय करायचे ते करा, केंद्रातही कोणाशी चर्चा करा, पण अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा झालीच पाहिजे अन्यथा सभागृहात आणि रस्त्यावरही शिवसेना आपला हिसका दाखवील, असा स्पष्ट इशारा शिवसेनेने विधानसभेतच मुख्यमंत्र्यांना दिला होता. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीवारीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 17, 2017 08:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close