S M L

दुष्काळातून सावरलेल्या लातूरला अवकाळी तडाखा, बळीराजाच्या डोळ्यात पुन्हा पाणी !

Sonali Deshpande | Updated On: Mar 16, 2017 07:59 PM IST

दुष्काळातून सावरलेल्या लातूरला अवकाळी तडाखा, बळीराजाच्या डोळ्यात पुन्हा पाणी !

16 मार्च : गेल्या तीन वर्षापासून कोरडया दुष्काळाचा मार सहन करणाऱ्या लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट कोसळलंय. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ज्वारी, हरभरा, मका आणि द्राक्षबागांचं मोठं नुकसान झालं. यंदा पावसाळ्याच्या शेवटी झालेल्या मोठ्या पावसामुळे सोयाबिनचं नुकसान झालं होतं. त्याच्या पीक विम्याचे पैसे अजूनही मिळाले नाहीत. आता शेतकऱ्यांनी ज्वारी, गहू पेरला ते पीक हाताशी आलं पण तेही अवकाळीच्या तडाख्यात सापडलंय. त्यामुळे शेतकरी आणखीनंच अडचणीत सापडलाय.

दुष्काळाने होरपळलेल्या लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या वर्षी जून महिन्यात चांगला पाऊस झाल्याने सुगीचे दिवस आले होते. कर्ज काढून शेतकऱ्यांनी काळ्या मातीत काष्टाचा घाम गाळुन मेहनत केली. शेतकऱ्यांच्या मेहनतीला फळ देखील आलं. शेत शिवार बहरुन गेलं. ज्वारी, हराभरा, गहू हे पिक काढणीला आलं. मात्र अचानक मुसळधार पाऊस आणि गारपीठिचा तडाखा निसर्गाने दिला आणि शेतकर्यांची स्वप्न पुन्हा मातीमोल झाली. हाता तोंडाशी आलेला घासच निसर्गाने हिरावून घेतल्याने लातूर जिल्ह्यातला शेतकरी पुन्हा हवालदिल झालाय. शासनाच्या मदतीकड़ वाट पाहन्याची वेळ पुन्हा शेतकऱ्यांवर आली आहे.


औसा तालुक्यात सर्वाधिक नुकसान झालंय. ज्वारी, गहू, हरभरा, मका, द्राक्ष आणि आंबा हे पिकं पूर्णतः हाताबाहेर गेल्यानं शेतकऱ्यांसमोर आता नवं संकट उभं राहिलंय. औसा तालुक्यातल्या मासुर्डी गावासह इतर दोन खेडेगावात गारपीठ झाल्यानं मोठं नुकसान झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 16, 2017 07:59 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close