अवकाळी पावसाचा कहर, काढणीचं पिकंही पाण्यात!

अवकाळी पावसाचा कहर, काढणीचं पिकंही पाण्यात!

  • Share this:

parbhani 1

परभणी, 16 मार्च : दुष्काळाचे नाव जरी काढलं तर अंगावर काटा येतो अशी परिस्थिती मराठवाड्यात झाली होती. यानंतर यंदा चांगला पाऊस झाला पीकंही जोमात आली. मात्र काल झालेल्या अवकाळी पाऊस,गारपीट,वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलाय.

परभणी जिल्ह्यातील सोनपेठ,पाथरी,गंगाखेड आणि परभणी तालुक्यात काल जोरदार अवकाळी पाऊस,गारा,वादळी वारे सुटले. यामुळं हजारो हेक्टरवर घेतलेली गहू,ज्वारी,हरभरा,मका या पिकांबरोबरच आंबा, मोसंबी आदी फळपिकांचे मोठं नुकसान झालं आहे. विशेष म्हणजे गहू,ज्वारी,हरभरा,काढणीला आला होता. काही शेतकऱ्यांनी ही पिकं काढलीही होती. मात्र अवकाळी पावसाने या सर्व पिकांचं मोठं नुकसान केलं आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. प्रशासनानं झालेल्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 16, 2017 07:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading