S M L

फडणवीसांना संरक्षण मंत्रिपदी बढती हा माध्यमांचा शोध-गडकरी

Sachin Salve | Updated On: Mar 16, 2017 05:56 PM IST

 फडणवीसांना संरक्षण मंत्रिपदी बढती हा माध्यमांचा शोध-गडकरी

16 मार्च : फडणवीसांना संरक्षण मंत्रिपदी बढती हा माध्यमांचा शोध असल्याचं सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी फडणवीसांच्या बढतीचा मुद्दा खोडून काढला.

काँग्रेसमधून नेमकं मुख्यमंत्री कुणाला करायचं हेच त्यांना ठरवता आलं नाही म्हणून त्यांना मुख्यमंत्रिपदाला मुकावं लागल्याचं विश्लेषण गोव्याचे भाजप प्रभारी नितीन गडकरींनी केलंय. पर्रिकरांनी बहुमत सिद्ध केल्यानंतर ते मुंबईत बोलत होते.

काहींनी पर्रिकरांनी संरक्षण मंत्रीपद सोडून येऊ नये असं मत मांडलं पण सहकारी पक्षांना पर्रिकरच हवे होते. त्यामुळे त्यांच्याच हाती धुरा सोपवावी लागली असंही गडकरी म्हणाले.विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत शिवसेनेला ६०० मतं पडली होती आणि यंदा ७९२ मिळाल्याचा चिमटा काढायलाही गडकरी विसरले नाहीत. मनोहर पर्रिकर यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यामुळे  संरक्षणमंत्रिपद रिक्त झाले. त्यामुळे संरक्षणमंत्रिपदी कोण अशी चर्चा रंगली होती. अडीच वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चांगल्या कामामुळे त्यांना केंद्रात बढती मिळेल अशा तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. आज नितीन गडकरी यांनी या सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम दिला. देवेंद्र फडणवीस यांचं काम चांगलं आहे. पण, त्यांना फडणवीसांना संरक्षण मंत्रिपदी बढती हा माध्यमांचा शोध आहे असं म्हणत त्यांनी बढतीचा मुद्दा खोडून काढला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 16, 2017 04:54 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close