S M L

काय आहे करणी सेनेचा राणी पद्मावतीशी संबंध?

Sonali Deshpande | Updated On: Mar 16, 2017 01:37 PM IST

काय आहे करणी सेनेचा राणी पद्मावतीशी संबंध?

अमेय चुंभळे, 16 मार्च : कोल्हापूरमध्ये पद्मावतीचा सेट पेटवण्यात आला.राजस्थानमध्ये शूटिंग सुरू असताना संजय लीला भन्साळींना धक्काबुक्की झाली होती.दोन्ही घटनांमागे राजपूत करणी सेनेचा हात आहे.अखेर ही करणी सेना आहे काय? आणि तिचा राणी पद्मावतीशी काय संबंध? ही राणी खरंच अस्तित्वात होती तरी का ?

संजय लीला भन्साळींचा महत्त्वाकांक्षी पद्मावती हा चित्रपट. दीपिका पदुकोण, रणवीर सिंह आणि शाहीद कपूरच्या मुख्य भूमिका. मंगळवारी रात्री कोल्हापूर जिल्ह्यात याचा सेट पेटवण्यात आला.सुदैवानं जीवितहानी झाली नाही पण सेट, कपडे आणि इतर सामुग्रीचं खूप नुकसान झालं. पद्मावती चित्रपटाबाबत ही काही पहिली घटना नाही. राजस्थानमध्ये शूट सुरू असताना करणी सेनेनं भन्साळींना धक्काबुक्की केली होती. त्यामुळे त्यांनी तिथला गाशा गुंडाळला, आणि कोल्हापुरात सेट लावला. पण इथेही तेच.. राणी पद्मावतीबाबत चुकीची माहिती दिली जातेय, आणि चित्रपटात अश्लील सीन्स आहेत असा करणी सेनेचा आक्षेप आहे.पण इथेच मोठी गोची आहे.राणी पद्मिनी किंवा पद्मावती ही दंतकथा आहे. ती अस्तित्वात असल्याचा कोणताही पुरावा नाही. 1540 साली मलिक मुहम्मद जयासीवनं एक दीर्घ कविता लिहिली. पद्मावत नावाची. या कवितेत पद्मावतीचा उल्लेख पहिल्यांदा आला. अशी दंतकथा आहे की 13व्या शतकात चित्तोडचा राजा रावल रतन सिंग यानं एका बोलक्या पोपटाकडून पद्मावतीच्या सौंदर्याबद्दल ऐकलं. तिच्यासाठी तो श्रीलंकेत गेला. तिच्याशी लग्न केलं आणि तिला चित्तोडला आणलं. मग 14व्या शतकात अल्लाऊद्दीन खिलजीनं पद्मावतीच्या असामान्य सौंदर्याबद्दल ऐकलं आणि तो चित्तोडवर चालून गेला. खिलजीनं चित्तोडवर हल्ला केला होता, हे खरं आहे. पण हल्ला पद्मावतीसाठी केला, याचा कुठेही पुरावा नाही. अनेक कवी आणि लेखकांनी तिचा उल्लेख केलाय पण इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार ती दंतकथाच आहे.

पण राजपूत करणी सेनेला तसं वाटत नाही. त्यांच्यासाठी राणी पद्मिनी राजपूत अस्मितेचं चिन्हं आहे. राणी जोधाबाई सारखंच. पण ज्यांना चित्रपटात काय आहे ते माहीत नाही, त्याची स्क्रिप्ट वाचली नाही, ते निव्वळ अफवांवरून आक्षेप नोंदवतायेत. दुसरं म्हणजे यात राजकारणही आहे. राजपूत करणी सेनेचे संस्थापक आहेत लोकेंद्र सिंग कालवी. राजकारणात यांची डाळ शिजली नाही म्हणून महाशयांनी राजपूत करणी सेना काढली. आणि आता अस्मितेच्या नावावर आपलं महत्त्वं पटवून द्यायचा प्रयत्न करतायेत.भन्साळींच्याच बाजीराव मस्तानीच्या वेळीही असेच वाद झाले होते.गोवारीकरांच्या 'जोधा अकबर'चीही तीच कहाणी.पद्मावतीच्या शूटिंग दरम्यानच एवढे वाद सुरू आहेत.रिलीजच्या वेळी काय होईल, ते पाहायचं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 16, 2017 12:00 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close