S M L

अवकाळी पावसात बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना 4 लाख रूपयांची मदत - खोत

Samruddha Bhambure | Updated On: Mar 16, 2017 12:41 PM IST

Sadabhau khot

16 मार्च :   राज्यात ठिकठिकाणी झालेल्या अवकाळी पावसात बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना 4 लाख रूपयांची मदत देण्याची घोषणा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज केली. त्याचबरोबर, अवकाळी पावसात दगावलेली व्यक्ती शेतकरी असेल तर त्यांच्या कुटुंबियांना 'गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजने'अंतर्गत 2 लाख रूपयांची मदत करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

राज्यातील ठिकठिकाणी अवकाळी पाऊस झाला आहे. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका परभणी, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर आदी जिल्ह्यांना बसला आहे. सोलापूरमध्येही पंढरपूरसह मंगळवेढा, मोहोळ, अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूरमध्ये पावसासह गारपीटीनं झोडपलं आहे. यात द्राक्ष बागांसह ज्वारी, गहू, हरभरा पिकांचं नुकसान झालं आहे. बीड जिल्ह्यातील 5 जणांचा वीज पडून मृत्यू झाला होता. तर लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यातील गारांच्या पावसामुळे पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. अचानकपणे झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे.


द्राक्ष बागांमध्ये तयार झालेली द्राक्षे काढली जात असताना अचानक झालेला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा द्राक्ष बागांना फटका बसला आहे. या पावसामुळे सामान्य शेतकऱ्यांसह द्राक्ष बागायतदारांची झोप उडाली आहे. काही ठिकाणी आंब्याचा मोहोर गळाल्यानेही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी पंढरपूरमधील गारपीटग्रस्त भागांची पाहणी करून परिस्थितीचा आढाव घेतला. यावेळी अवकाळी पावसात मृत्यू झालेल्यांच्या वारसांना 4 लाखांची मदत केली जाईल अशी घोषणाही त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 16, 2017 12:41 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close