S M L

... नाहीतर अर्थसंकल्प मांडू देणार नाही, शिवसेनेचा सरकारला इशारा

Samruddha Bhambure | Updated On: Mar 16, 2017 11:04 AM IST

uddhav-and-devendra

16 मार्च :   राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून शिवसेना चांगलीच आक्रामक झाली असून येत्या दोन दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय घ्या, अन्यथा अर्थसंकल्प मांडू देणार नाही, अशी भूमिका शिवसेना आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या बैठकीत घेतल्याची माहिती एका वृत्तवाहीनीने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विरोधी पक्ष आणि शिवसेना आक्रामक बघायला मिळत आहेत. तसंच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही तसे संकेत दिले होते. मात्र आता शिवसेना अधिकच आक्रामक झाली असून दोन दिवसात याबाबत निर्णय घेण्याचा इशारा भाजपला दिला आहे. शिवसेना आमदारांनी आपापल्या मतदार संघातील अनेक गोष्टी उद्धव ठाकरेंसमोर मांडल्या. आमदारांच्या कामांचा अंतर्भाव या अर्थसंकल्पातून भरला जावा, यासाठी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करण्यात आली, अशी माहिती शिवसेना प्रतोद सुनील प्रभू यांनी दिली.


दरम्यान, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची संसदेतल्या पंतप्रधान कार्यालयात 15 ते 20 मिनिटं चर्चा झाली. मात्र, ही चर्चा नेमकी कशाबाबत झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे. शेतकरी कर्जमाफीविषयी चर्चा झाली असावी, असा अंदाज लावला जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 16, 2017 08:46 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close