S M L

मूल दत्तक घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या विशेष रजेत वाढ

Samruddha Bhambure | Updated On: Mar 16, 2017 10:50 AM IST

मूल दत्तक घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या विशेष रजेत वाढ

16 मार्च :  एक वर्षापेक्षा कमी वय असलेलं मूल दत्तक घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या मातृत्व रजेत दुपटीने वाढ करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या सेवेतील मूल दत्तक घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना 90 दिवसांऐवजी 180 दिवसांची विशेष रजा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

केंद्र सरकारने प्रसुती रजेप्रमाणेच 180 दिवसांची विशेष रजा मूल दत्तक घेणाऱ्या केंद्रीय कर्मचारी महिलेला देण्याचा निर्णय घेतला होता. त्याच धर्तीवर आता राज्य सरकारमधील कर्मचारी महिलांबाबतही अर्थ मंत्रालयाने हाच निर्णय घेतला आहे. मूल दत्तक घेतल्याच्या तारखेपासून ही रजा लागू होईल.


दत्तक मूल संगोपन विशेष रजेशिवाय, दत्तक मुलाचे वय लक्षात घेऊन असाधारण रजाही देण्यात येणार आहे. त्यानुसार दत्तक मुलाचे वय एक महिन्यापेक्षा कमी असेल तर एक वर्ष, सहा महिने आणि सात महिन्यांपेक्षा कमी असेल तर, सहा महिने, दत्तक मुलाचे वय ९ महिने आणि दहा महिन्यांपेक्षा कमी असेल तर तीन महिन्यांची रजा मिळेल. पण या निर्णयाचा लाभ घेण्यासाठी मूल दत्तक घेण्यासंबंधातील कायदेशीर कागदपत्रे, दत्तक संस्थेची कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

महत्त्वाचं म्हणजे, एक वर्षापर्यंतचं मूल दत्तक घेतलेल्या ज्या महिला कर्मचारी सध्या 90 दिवसांच्या विशेष रजेवर आहेत, त्यांनाही आता 180 दिवसांपर्यंत विशेष रजा लागू होईल. तर दोनपेक्षा कमी अपत्य असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना 180 दिवसांची विशेष रजा लागू राहील. एक अपत्य हयात असलेल्या कर्मचारी महिलेने ही विशेष रजा घेतल्यानंतर दत्तक मुलासाठी किंवा सरोगसीसाठी असलेली विशेष रजा लागू राहाणार नाही.

विशेष रजेसाठी संबंधित महिला कर्मचाऱ्यांना सेवा कालावधीची अट नसेल. मात्र ज्या महिला कर्मचाऱ्यांची सेवा दोन वर्षांपेक्षा कमी झालेली आहे, त्यांनी अर्ज करताना त्यांच्या कार्यालयाला बाँड द्यावा लागेल. त्यानुसार विशेष रजेवरुन परतल्यानंतर दोन वर्षे सेवेत राहणं अनिवार्य असेल. राजीनामा द्यायचा असेल, तर तिला विशेष रजा कालावधीतील वेतनाइतके वेतन राज्य शासनाला द्यावं लागेल.

Loading...
Loading...
Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 16, 2017 10:50 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close