S M L

बहुप्रतीक्षित 'बाहुबली 2'चं ट्रेलर लाँच

Samruddha Bhambure | Updated On: Mar 16, 2017 04:18 PM IST

बहुप्रतीक्षित 'बाहुबली 2'चं ट्रेलर लाँच

16 मार्च :   बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेल्या ‘बाहुबली 2 – द कन्क्लूजन’ या सिनेमाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित करण्यात आला आहे. सिनेमाचा हा ट्रेलर बाहुबली या अधिकृत फेसबुक, ट्विटर हँडल आणि यूट्युब चॅनलवर रिलीज करण्यात आला आहे.बाहुबली सिनेमाच्या नावाची भारतीय सिनेमाच्या इतिहासात नोंद झाली आहे. दक्षिण भारतात बनलेल्या या सिनेमाचा हिंदी सिनेमाही खुपच लोकप्रिय ठरला. आता प्रेक्षकांना प्रतिक्षा आहे ती म्हणजे सिनेमाच्या दुस-या भागाची. कारण कटप्पानं बाहुबलीला का मारलं, याचं उत्तर 28 एप्रिलला मिळणार आहे.

दोनशे कोटीचं बजेट असणाऱ्या या सर्वात महागड्या चित्रपटाचे  हिंदीसाठीचे हक्क फिल्म निर्माता करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्सनं  विकत घेतलेत. तामिळ आणि तेलुगूमध्येही या चित्रपटचं शूटिंग झालं असून हिंदी, मल्याळी, कन्नडमध्ये तो डब केला आहे.

यापूर्वी सोमवारी सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला होता. 12 सेकंदाच्या हा टीझर केवळ 24 तासांमध्ये 12 लाखांहून अधिकवेळा पाहिला गेला होता.

Loading...
Loading...
Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 16, 2017 12:31 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close