अर्थशास्त्र विभाग आता मुंबई स्कूल आॅफ इकाॅनाॅमिक्स

अर्थशास्त्र विभाग आता मुंबई स्कूल आॅफ इकाॅनाॅमिक्स

  • Share this:

mum vidya

विवेक कुलकर्णी,15 मार्च : देशातील सगळ्यात जुना अर्थशास्त्र विभाग अर्थात मुंबई विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाचं नाव आता मुंबई स्कूल आॅफ इकाॅनाॅमिक्स असं करण्यात आलंय. लंडन स्कूल आॅफ इकाॅनाॅमिक्सच्या धर्तीवर हे नामकरण करण्यात आलं असून हा फक्त नावबदल नाहीये. तर या विभागाची व्याप्तीही वाढवण्यात आली आहे.

फक्त शिकणं आणि संशोधन इतकंच नाही तर या विभागातील विद्यार्थी आता सरकारच्या ध्येयधोरणांचं मूल्यमापन करून दिशादर्शन करणारे थिंक टॅंक म्हणून काम करू शकणार आहेत.

केंब्रिज विद्यापीठ, कॅलिफोर्निया विद्यापीठ यासारख्या विद्यापीठांशी टाय अप करुन त्यांच्याशी ज्ञानाचं आदान प्रदान करता येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 15, 2017, 7:49 PM IST

ताज्या बातम्या