मराठवाड्याला गारपिटीचा तडाखा, वीज पडून 3 जणांचा मृत्यू

मराठवाड्याला गारपिटीचा तडाखा, वीज पडून 3 जणांचा मृत्यू

  • Share this:

GARPIT WEB

15 मार्च : मराठवाड्याला पुन्हा एकदा गारपिटीने झोडपलंय. बीड जिल्ह्यात परळी आणि माजलगावमध्ये अनेक गावांमध्ये गारपीट झालीय. बीडमध्ये वीज पडून तीन जणांचा मृत्यू ओढवला तर तीन जण गंभीर जखमी आहेत. या गारपिटीमुपळे शेतीचं मोठं नुकसान झालं. ज्वारी, गहू, तूर शेतीची गारपिटीमुळे वाताहत झालीय.

परभणी जिल्ह्यालाही गारपिटीचा फटका बसलाय. सोनपेठ आणि पाथरी तालुक्यांतल्या गावांचं या गारपिटीमुळे मोठं नुकसान झालं. लातूर जिल्ह्यांतही काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि गारपीट झाली. याचा फटका इथल्या रब्बी पिकांना बसलाय. सोनपेठ आणि पाथरी तालुक्यांतल्या गावांमध्ये गारांचा वर्षाव झाल्यामुळे घरांचे पत्रे उडाले. परळी तालुक्यात कौठाळी गावातही गारपीट झालीय. माजलगाव तालुक्यात खाडेवाडी , दिंद्रुड या गावांत घरांचं नुकसान झालंय.

पंढरपूर, सोलापूर, उस्मानाबादमध्येही काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला आणि गारपीट झाली. इथेही रब्बी हंगामातल्या पिकांना मोठा फटका बसलाय. घरांचंही नुकसान झालंय. गेल्या काही वर्षांत सततच्या होणाऱ्या गारपिटीमुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय. या पार्श्वभूमीवर गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीची गरज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 15, 2017 06:09 PM IST

ताज्या बातम्या