शेतकरी कर्जमाफीसाठी शिवसेनेचा भाजपवर दबाव

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Mar 15, 2017 06:19 PM IST

शेतकरी कर्जमाफीसाठी शिवसेनेचा भाजपवर दबाव

uddhav devendra

15 मार्च : शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी शिवसेनेनं भाजपवर दबाव आणायला सुरुवात केलीय.कर्जमाफीच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांसह पंतप्रधानांची भेट घ्यावी अशी शिवसेनेची भूमिका आहे.

सेनेच्या सर्व मंत्र्यांची मातोश्रीवर आज एक बैठक पार पडली.त्या बैठकीमध्ये शिवसेनेच्या कर्जमाफीसंदर्भातील भूमिकेवर चर्चा झाली.आता सेनेचे मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वर्षा या त्यांच्या

निवासस्थानी भेट घेतायत. भेटून या बैठकीसंदर्भातली माहिती देणार असल्याचं रामदास कदम यांनी सांगितलं.

मीडियाशी बोलताना रामदास कदम म्हणाले, 'उद्धवसाहेबांचं म्हणणं आहे की, कामकाजही झालं पाहिजे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीही मिळाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी तातडीनं दिल्लीला जावं आणि पंतप्रधानांना भेटून ठोस निर्णय घ्यावा.'

Loading...

त्याआधी विधानसभेत आजही कर्जमाफीवरून गदारोळ सुरू होता.विधानसभा दिवसभरासाठी तहकूब करावी लागली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुन्हा एकदा सराकरवर टीका केली, 'गेल्या वर्षापासून आम्ही ही मागणी करतोय.पण सरकार फक्त टाळाटळ करतंय.सरकारला मुळात कर्ज माफ करायचंच नाही,' असा आरोप त्यांनी केला.

'हे सरकार शेतकरीद्रोही आहे.मी स्वतः अर्थमंत्री होतो.हा निर्णय घ्यायला एवढा वेळ लागतोच कसा,' असा सवाल राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 15, 2017 04:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...