शशांक मनोहर यांचा आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

शशांक मनोहर यांचा आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

  • Share this:

5Shashank-Manohar2-1

15 मार्च : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्ष शशांक मनोहर यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. शंशाक मनोहर यांनी आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून यामागे वैयक्तिक कारण असल्याचं सांगितलं आहे.

शशांक मनोहर यांनी मे २०१६ साली आयसीसीच्या अध्यक्षपदावर बिनविरोध निवड झाली होती. दोन वर्षांसाठी आयसीसीच्या अध्यक्षपदाची धुरा मनोहर यांच्याकडे सोपवण्यात आली होती. पण आपला वर्षभराचा कार्यकाल शिल्लक असताना असा तडकाफडकी राजीनामा मनोहर यांनी दिल्याने सर्वांना धक्का बसला आहे.

शशांक मनोहर हे विख्यात वकिल आहेत. 2008 ते 2011मध्ये ते बीसीसीआयचे अध्यक्ष देखील होते. जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर ऑक्टोबर 2015 साली मनोहर यांनी पुन्हा बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आली होती. आयसीसीच्या अध्यक्षपदाची खुर्ची रिकामी झाल्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडून मनोहर यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी वर्णी लागली होती.

मनोहर यांनी गेल्या वर्षभरात लोकप्रिय घोषणा केल्या नसल्या तरी क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण बदल आणण्यासाठी काही ठोस भूमिका त्यांनी मांडल्या होत्या. मनोहर यांच्या भूमिकांना आयसीसीमध्ये विरोध झाल्याचे सांगण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 15, 2017 02:41 PM IST

ताज्या बातम्या