कोल्हापूरात अज्ञातांकडून 'पद्मावती'च्या सेटची जाळपोळ

कोल्हापूरात अज्ञातांकडून 'पद्मावती'च्या सेटची जाळपोळ

  • Share this:

Bhansali SET

15 मार्च :  बॉलिवूड निर्माता -दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी सिनेमाविरोधातील वाद वाढतच आहेत. भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ चित्रपटाच्या सेटला मंगळवारी रात्री आग लावण्याचा प्रयत्न झाला.

कोल्हापुरातील मसई पठारावर सध्या या चित्रपटाचे शुटिंग सुरू आहे. यासाठी सेट उभारण्यात आला आहे. मात्र, काल रात्री साडे नऊच्या सुमारास 30-40 अज्ञात व्यक्तींनी याठिकाणी तोडफोड करत सेटची जाळपोळ करण्याचाही प्रयत्न केला. त्याचबरोबर, सेटच्या बाहेर उभ्या गाड्यांही जाळण्यात आल्या आहेत.

दरम्यान, आता पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, याप्रकरणाचा तपास करत आहेत. काही महिन्यांपूर्वी राजस्थानमध्ये पद्मावमतीचे चित्रिकरण सुरू असताना करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी भन्साळी यांना मारहाण केली होती. त्यानंतर या चित्रपटाचे शुटिंग कोल्हापूरमध्ये करण्याचा निर्णय झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 15, 2017 11:35 AM IST

ताज्या बातम्या