S M L
Football World Cup 2018

गोव्यात सत्तेसाठी लोकशाहीचा खूनच - उद्धव ठाकरे

Samruddha Bhambure | Updated On: Mar 15, 2017 11:55 AM IST

Uddhav thackraydlhajhsd

15 मार्च :  'सत्तेसाठी गोव्यात जी राजकीय धुळवड खेळली गेली तो लोकशाहीचा खूनच आहे. गोव्यात असे खून अनेकदा झाल्यानं आता त्यात आणखी एका खुनाची भर पडली आहे,' असं सांगतानाच,' असे खून पचवायची शक्ती आमच्या लोकशाहीला मिळो,' अशा उपरोधिक शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोव्यातील सत्तास्पर्धेवर भाष्य केलं आहे.

गोव्यात 17 जागा जिंकूनही काँग्रेसला सत्ता स्थापन करता आली नाही. अवघ्या 13 जागा मिळवलेल्या भाजपनं छोटो पक्ष आणि अपक्षांच्या मदतीनं सत्तेचा सोपान चढण्याचा पराक्रम केला आहे. गोव्यातील निवडणुकीत भाजपची ही चलाख राजकीय खेळी शिवसेनेला भलतीच झोंबल्याचं दिसत आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना शुभेच्छा देताना लोकशाहीच्या खुनाचा दाखला देत भाजपवर खोचक टीका केली आहे.

दिल्लीतून मुख्यमंत्री लादण्याची परंपरा काँग्रेसची होती. गोव्याच्या बाबतीत भाजपने काँग्रेस परंपरेचीच ‘री’ ओढली. असं सांगत सुप्रिम कोर्टाने पर्रीकर यांच्या शपथविधीला स्थगिती देण्यास नकार दिल्याने काँग्रेसच्या दाव्यातील पोकळपणाच उघड झाला असल्याचंही  सामनात म्हटलं आहे.

दरम्यान, सत्तेसाठी गोव्यात जी राजकीय धुळवड खेळली गेली तिला लोकशाहीचा खून याशिवाय वेगळे काही म्हणता येणार नाही. अर्थात, लोकशाहीचा असा खून गोव्यात अनेकदा झाला आहे. त्यात आणखी एका खुनाची भर पडली. खून पचवायची शक्ती आमच्या लोकशाहीला मिळो, असं सांगत शिवसेनेने आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 15, 2017 10:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close