शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजणार

  • Share this:

vidhan sabha 1

15  मार्च :  चार दिवसांच्या सुट्टीनंतर विधानसभा आणि विधानपरिषदेच्या कामकाजाला आजपासून पुन्हा सुरुवात होणार आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या घोषणेसाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अडले आहेत. त्यामुळे राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातही देवेंद्र फडणवीस सरकारची कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन झालेली कोंडी आज देखील कायम रहाण्याची शक्यता आहे.

याआधीही विधीमंडळाचं अधिवेशन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन गाजलं. मात्र जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोवर कामकाज चालू देऊ नका असा पवित्रा शिवसेनेने पवित्रा घेतला आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसही कर्जमाफीच्या मुद्यावरुन आक्रमक झाले आहेत. त्याची रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आज सकाळी दहा वाजता बैठक होणार आहे.

 या घडामोडी पहाता विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सराकरची चांगलीच कोंडी होणार आहे. त्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज गोंधळानं सुरु होईल असं चित्र दिसतंय . या संपूर्ण परिस्थितीत मुख्यमंत्री कर्जमाफीवर निवेदन करतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 15, 2017 08:39 AM IST

ताज्या बातम्या