काँग्रेसमध्ये खालपासून वरपर्यंत नेतृत्व बदलाची गरज - सुशीलकुमार शिंदे

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Mar 15, 2017 09:06 AM IST

 

Sushil kumar shinde123

15 मार्च :  'काँग्रेस पक्षात खालपासून वरपर्यंत नेतृत्व बदलाची गरज आहे. तसेच सर्व कमिटी बरखास्त करुन नव्या दमाची काँग्रेस उभी करावी', असा सल्ला माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेस नेतृत्वाला दिला आहे.

देशातील ५ राज्यातील निवडणुका आणि महाराष्ट्रातील जिल्हापरीषद महापालिकेच्या निवडणुकानंतर पहिल्यांदाच सोलापुरात पत्रकार परीषदेत ते बोलत होते.

लोकसभेच्यावेळची भाजपाची हवा आजही कायम आहे. उत्तर प्रदेशसह इतर राज्यात भाजपला जनतेनी निवडून दिले म्हणजे जनतेला अजूनही मोदीच हवं आहे,असं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात स्वच्छतेचे धडे देत फिरतात. मात्र, त्यांच्या मतदार संघात सर्वत्र घाणच घाण आहे. रस्ते खराब असताना देखील जनतेने त्यांना स्विकारले. आपणही त्याच स्वीकार करावा, असंही ते म्हणाले.

Loading...

इव्हीएम मशिनबाबत देशात संशयकल्लोळ असल्याने सर्वच राजकीय पक्षाने एकत्रित यावर विचार करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

राज्यात जिल्हा परीषदेत सेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या आघाडीबाबत बोलताना त्यांनी जातीयवादी पक्षांसोबत जाणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 15, 2017 09:06 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...