नासाने शोधून काढलं 2009 पासून हरवलेलं भारताचं पहिलं चांद्रयान

नासाने शोधून काढलं 2009 पासून हरवलेलं भारताचं पहिलं चांद्रयान

  • Share this:

chandrayan-114  मार्च : 22 ऑक्टोंबर 2008 मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) ने अवकाशात सोडलेल्या चांद्रयानाचा नासाने शोध लावला आहे. चांद्रयान-1 असं या यानाचं नाव आहे. नासाच्या वैज्ञानिकांनी असा दावा केला आहे की चांद्रयान-1 हे अंतराळ यान अजूनही चंद्राच्या भोवती प्रदक्षिणा घालत आहे. वैज्ञानिकांनी नवनव्या टेकनिक्स् वापरुन या यानाचा शोध लावला.

या यानाला अवकाशात सोडल्यानंतर अवघ्या वर्षभरातच म्हणजेच 29 ऑगस्ट 2009 मध्ये याचा संपर्क तुटला, आणि त्यानंतर इस्त्रोने हे यान हरवलं असल्याचं जाहीर केलं.

कुठे आहे चांद्रयान ?

नासाच्या संशोधनानुसार चांद्रयान-1 हे सध्या चंद्राची प्रदक्षिणा करत आहे. ते चंद्राच्या पृष्टभागाच्या जवळपास 200 किमी वरच्या बाजूस प्रदक्षिणा करत आहे. याच संशोधनाबरोबरच चंद्राची देखरेख करणाऱ्या लुनर रिकानिसंस आर्बिटर या अंतराळयानाला शोधण्याचा दावाही नासाने केला आहे.

काय म्हणणंय नासाचं ?

नासाच्या जेट प्रोपल्सन या प्रयोगशाळेतील एक वैज्ञानिक मरीना ब्रोजोविकच्यामते लुनर रिकानिसंस आर्बिटर आणि चांद्रयान-1 हे यान चंद्राच्या कक्षेत जमिनीच्या दिशेनं स्थिर असल्याची ओळख झाली आहे.

नासाने आपल्या अवहालात असं म्हटलंय की, लुनर रिकानिसंस आर्बिटर शोधनं फार सोपं होतं, कारण आम्ही मिशन नेविगेटर सोबत काम करत होतो आणि आमच्याकडे त्याच्या कक्षाच्या स्थितीतील योग्य ते आकडे होते. पण त्याच्या तुलनेत चांद्रयान-1 ची ओळख पटवणं फार कठीण गेलं, कारण ते 2009 सालीच हरवलं होतं. नासाच्या म्हणण्यानुसार चंद्राच्या वेगवेगळ्या छटांमुळे त्यात लपलेल्या लहान वस्तुंचा शोध लावण्यासाठी आवश्यक असलेला ऑप्टिकल दुरबीन खराब झाली आहे. त्यामुळे योग्य तो शोध लागत नाही आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 14, 2017, 10:06 PM IST

ताज्या बातम्या