News18 Lokmat

बीएमसी समित्याही शिवसेनेच्या खिशात

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Mar 14, 2017 08:18 PM IST

बीएमसी समित्याही शिवसेनेच्या खिशात

bmc_korgaonkar3

14 मार्च : मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी शिवसेनेचे रमेश कोरगावकर तर शिक्षण सभापतीपदी शिवसेनेच्याच शुभदा गुडेकर यांची बिनविरोध निवड झालीये. भाजपनं जाहीर केल्यानुसार समित्यांच्या निवडणुकीसाठी उमेदवार दिलेला नाही.

 

स्थायी समिती निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिवसेनेकडून शेवटच्या क्षणी अचानक उमेदवार बदलण्यात आला होता. मंगेश सातमकर यांना डच्चू देऊन भांडुपच्या वाॅर्ड क्रमांक 114 चे नगरसेवक रमेश कोरगावकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. भांडुप विधानसभा मतदारसंघातून अशोक पाटील यांना आमदारकी दिल्याने रमेश कोरगावकरांची संधी हुकली होती. महापौरपदासाठी पूर्व उपनगरातून सक्षम उमेदवार म्हणून चर्चा होती. मात्र तीही संधी हुकल्यामुळे अखेरीस त्यांची वर्णी स्थायी समितीसाठी लागलीये.

 

Loading...

कोण आहेत रमेश कोरगावकर ? - वॉर्ड क्रमांक 114चे नगरसेवक (भांडुप) - नगरसेवकपदी चौथ्यांदा विराजमान - स्थापत्य समिती अध्यक्ष ( उपनगर ) आणि - सलग सात वर्ष स्थायी समिती सदस्य

 

दुसरीकडे 16 तारखेला होणाऱ्या निवडणुकीसाठी बेस्ट समिती अध्यक्ष म्हणून अनिल कोकीळ तर सुधार समिती अध्यक्षपदासाठी अनंत नर यांनी आज अर्ज भरलाय. या निवडणुकाही बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

 

त्यामुळे मुंबई महानगर पालिकेत शंभर टक्के शिवसेना अशी स्थिती निर्माण झालीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 14, 2017 08:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...