News18 Lokmat

धुळे डाॅक्टर मारहाण प्रकरणातील संशयिताचा पोलीस कोठडीत गळफास

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 14, 2017 08:01 PM IST

धुळे डाॅक्टर मारहाण प्रकरणातील संशयिताचा पोलीस कोठडीत गळफास

14 मार्च :धुळे जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या संशयित आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू झालाय. प्रदीप वेताळ असं या संशयित आरोपीचं नाव आहे.

धुळे शहरातील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात डॉ रोहन मामुनकर या निवासी अस्थिरोग तज्ञ डॉक्टरला बेदम मारहाण करण्यात आली. सर्वोपचार रुग्णालयातील अपघात विभागात डॉ.मामुनकर यांना ही गंभीर मारहाण करण्यात आली आहे. अपघातात जखमी झालेल्या एका तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. यावेळी डॉ मामुनकर यांनी सदर रुग्णाला सिटीस्कॅन करण्याची गरज असून न्यूरो सर्जनची आवश्यकता असल्याचं सांगितलं.

मात्र रुग्णालयात न्यूरोसर्जन नसल्याने आणि सिटीस्कॅन करण्यावरून यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांची डॉक्टरांशी शाब्दिक चकमक झाली. यावेळी चिडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉ.मामुनकर याना लाथा बुक्यांनी मारहाण केली. या मारहाणीत डॉक्टर मामुनकर यांच्या एका डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे.

या प्रकरणी २० पेक्षा अधिक जणांविरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी ९ जणांना अटक करण्यात आली. यामध्ये  प्रदीप वेताळ होता. प्रदीपला धुळ्याच्या शहर पोलिसांच्या लॉक अपमध्ये ठेवण्यात आलं होतं. तिथच त्यानं आत्महत्या केल्याचा दावा पोलिसांनी केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 14, 2017 08:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...