News18 Lokmat

'गोलमाल 4' कुटुंबात तब्बू आणि परिणिताची एन्ट्री

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Mar 14, 2017 08:24 PM IST

'गोलमाल 4' कुटुंबात तब्बू आणि परिणिताची एन्ट्री

14 मार्च : या वर्षाचा वाढदिवस रोहित शेट्टी याने आपल्या 'गोलमाल' फॅमिलीसोबत साजरा केला. रोहित शेट्टीने सोशल मीडियावर आपल्या गोलमाल फॅमिलीसोबतचा फोटो शेअर केला आहे. ही संपूर्ण टीम म्हणजे रोहितचा येणारा नवा चित्रपट गोलमाल - 4 चा नवा लूक आहे.

या चित्रपटामध्ये अजय देवगण, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, अर्शद वारसी आणि कुणाल खेमू हे जुने कलाकार असून यावेळी तब्बू आणि परिणिती चोप्रा यांची या क्रेजी फॅमिलीमध्ये एंट्री झाली आहे. गोलमाल 3नंतर सात वर्षांनी हा सिनेमा बनतोय.

बऱ्याच वर्षांनी तब्बू विनोदी सिनेमात काम करताना दिसेल. गोलमाल 3 हा बाॅक्स आॅफिसवर फारसा चालला नव्हता. रोहित शेट्टीच्या शेवटच्या दिलवाले या सिनेमालाही प्रेक्षकांचा कमी प्रतिसाद होता. त्यामुळे गोलमाल 4 हा रोहितसाठी महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट म्हणता येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 14, 2017 05:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...