News18 Lokmat

सेनेकडून भाजपची 'पंचाईत',औरंगाबादेत काँग्रेससोबत युती

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 14, 2017 07:28 PM IST

सेनेकडून भाजपची 'पंचाईत',औरंगाबादेत काँग्रेससोबत युती

14 मार्च : भाजपला अडचणीत आणण्याची शिवसेना एकही संधी सोडत नाही. औरंगाबाद जिल्ह्यात  नगर पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेनेनं युती केलीये.

मुबंई महापौर निवडणुकीत भाजप शांत राहिली आणि सेनेचा महापौर झाला. लोकांना वाटत होते की, सेना भाजपची आता निवडणुकीनंतरची युती होईल. मात्र औरंगाबादेत एक वेगळं गणित पंचायत समितीमध्ये बघायला मिळालं. सेना आणि काँग्रेसनं एकत्र येवून जिल्ह्यातील आठपैकी पाच पंचायती समिती ताब्यात घेतल्यात.

 काँग्रेस-शिवसेना युतीनं औरंगाबाद आठपैकी पाच पंचायत समित्यांमध्ये शिवसेना-काँग्रेसनं सत्ता स्थापन केलीये. भाजपला जिल्ह्यात चांगलं यश मिळूनसुद्धा शिवसेनेच्या तिरक्या चालीनं भाजप गारद झालीये. भाजपला चांगलं यश मिळवून सुध्दा काँग्रेस आणि सेनेनं भाजपला बाजूला ठेवून पंचायत समितीची सत्ता मिळवली.

 भाजपला फक्त तीन पंचायत समित्यांमध्ये सत्ता मिळवता आलीये. काँग्रेस- शिवसेना युतीचा हा पॅटर्न राज्यातल्या इतर पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांमध्ये राबवण्यात येणार का याबाबत उत्सुकता निर्माण झालीये.

आज राज्यात पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुका झाल्यात. अनेक जिल्हामध्ये वेगवेगळी राजकीय समिकरण उदयास आली आहे. पाहूयात कुठे काय समिकरण निर्माण झालंय.

Loading...

यवतमाळ

वेगळी समिकरण-7 पंचायत समितीत सेना- राष्ट्रवादी एकत्र,

5 ठिकाणी भाजप-काँग्रेस आघाडी

 

. गडचिरोली

वेगळी समिकरणं- आरमोरीत सेना-काँग्रेस,

तर उलचेरामध्ये काँग्रेस- भाजप युती, मुलचेरा इथ काँग्रेस-भाजप एकत्र

 

. अमरावती

- एकूण पंचायत समिती - 07

- वेगळी समिकरण-नांदगाव खंडेश्वर पंसमध्ये काँग्रेस- सेना युती, अचलपूरमध्ये प्रहार- राष्ट्रवादी युतीला काँग्रेसचा पाठिंबा

 

वर्धा

वेगळी समिकरण- वर्धा आणि सेलु पं समितीत भाजप- काँग्रेसची युती

 

परभणी

परभणीत काँग्रेस-भाजप,

पुर्णामध्ये भाजप- राष्ट्रवादी युती

 

बीड

तर देवराईमध्ये सेना-राष्ट्रवादी एकत्र

 

उस्मानाबाद

उमरग्यात काँग्रेस-भाजपची युती

 

सोलापूर

बार्शीमध्ये भाजप- राष्ट्रवादी एकत्र

 

सागंली

  शिरोळमध्ये भाजप-राष्ट्रवादीमध्ये आघाडी

 

 

कोल्हापूर

एक पसमध्ये भाजप-काँग्रेस, दोन पसमध्ये सेना-  राष्ट्रवादी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 14, 2017 07:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...