S M L

इजिप्तमध्ये सापडला महाकाय पुतळा

Sonali Deshpande | Updated On: Mar 14, 2017 07:10 PM IST

इजिप्तमध्ये सापडला महाकाय पुतळा

14 मार्च : इजिप्तमध्ये 3 हजार वर्षांपूर्वीच्या एका पुतळ्याचे अवशेष सापडलेत. इजिप्तची राजधानी कैरोपासून जवळच असलेल्या रामसिस सेकंडच्या मंदिराजवळ या पुतळ्याचे हे अवशेष सापडले. पुरातत्त्वज्ञांनी उत्खननामध्ये हा पुतळा बाहेर काढला. या पुतळ्याचं महाकाय डोकं आणि इतर अवशेष बाहेर काढण्यात आले.

हा पुतळा रामसिस सेकंड या सम्राटाच्या मंदिराजवळ सापडला. त्यामुळे तो रामसिस सेकंड याचाच असावा, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.रामसिस सेकंड या सम्राटाचं सुमारे 3 हजार वर्षांपूर्वी इजिप्तवर राज्य होतं. या सम्राटाचे पुतळे आणि मंदिरं इजिप्तमध्ये जागोजागी पाहायला मिळतात. आता सापडलेला हा पुतळा कैरोमधल्या वस्तूसंग्रहालयात ठेवला जाणार आहे. उत्खननात सापडलेले भग्नावशेष जोडून या पुतळ्याला आकार आणता येईल, असं तज्ज्ञांना वाटतंय.या पुतळ्याच्या उत्खननाची मोहीम सगळ्यांसाठीच आकर्षण ठरली होती. इजिप्तचे नागरिक जमिनीखालून हा पुतळा काढण्याच्या प्रक्रियेचे साक्षीदार आहेत. इजिप्तमधल्या सौक अल खमिस जिल्ह्यात ही मोहीम हाती घेण्यात आली होती. इजिप्त आणि जर्मनीमधल्या पुरातत्त्वज्ञांच्या टीमने ही मोहीम पार पाडली.

उत्खननात सापडलेल्या या पुतळ्याचं वजन तब्बल 3 टन आहे. या पुतळ्याचं डोकं गेल्या आठवड्यात उत्खननात सापडलंय. पुरातत्त्वज्ञांना हा शोध अत्यंत महत्त्वाचा वाटतोय. याच भागात असे आणखी शोध लागण्याचीही त्यांना अपेक्षा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 14, 2017 04:00 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close