छेडछाडीला कंटाळून तरुणीने पेटवून घेतलं

छेडछाडीला कंटाळून तरुणीने पेटवून घेतलं

  • Share this:

dhule_news314 मार्च : धुळे शहरात एका अल्पवयीन मुलीने एका तरुणाकडून होत असलेल्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडलीये. एकतानगरमध्ये राहणाऱ्या सोळा वर्षीय मुलीने आपल्या घरातच अंगावर रॉकेल ओतून स्वतःला जाळून घेतले आहे. सुदैवाने ती बचावली आहे. या तरुणीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही तरुणी  शहरातील एका खाजगी इंग्रजी शाळेत दहावीची शिक्षण घेत आहे. परिसरातच राहणाऱ्या संतोष यादव हा तरुण सतत तिला त्रास देत होता. लग्नाबाबत मागणी करत वारंवार पाठलाग करायचा. सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळत या तरुणीनं टोकाचं पाऊल उचलत स्वतःला जाळून घेतलंय.

तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून तीन जणांविरोधात देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संशयित आरोपी संतोष यादव याला अटक करण्यात आली असून दोन जण फरार झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 14, 2017 05:06 PM IST

ताज्या बातम्या