News18 Lokmat

कचऱ्याचा ढीग की मौत का कुआँ?

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Mar 14, 2017 05:10 PM IST

कचऱ्याचा ढीग की मौत का कुआँ?

14 मार्च : आफ्रिकेतील इथिओपियाची राजधानी आदिस अबाबामध्ये कचऱ्याचा भला मोठा डोंगर कोसळला आणि त्यात 48 जणांचा मृत्यू झाला. झालेल्या प्रकारात शेकडो जण अजूनही बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. शनिवारी रात्री उशिरा हा प्रकार घडल्याचं समजतंय.

या ढिगाऱ्याच्या आजूबाजूला तात्पुरत्या स्वरूपात अनेक घरं बांधण्यात आली होती, पण आता ही घरं ढिगाऱ्याच्या खाली गाडली

गेली आहेत. या घटनेच्या वेळी सुमारे 100 लोक तिथे उपस्थित होते आणि त्यात अनेक लहान मुलंही होती, त्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

शहरातील हा सगळ्यात मोठा कचऱ्याचा ढिगारा होता, गेल्या 5 दशकांपासून आदिस अबाबाच्या परिसरात कचरा मोठ्या प्रमाणात फेकला जात होता आणि त्याचाच हा परिणाम आहे, असं सूत्रांकडून समजतंय.

Loading...

कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावणं हे आताच्या काळात फारच कठीण आहे. योग्य ती यंत्रणा असूनही त्याचा योग्य तो वापर होत नाही आणि म्हणून आता हे कचऱ्याचे ढीग मौत का कुआँ बनलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 14, 2017 12:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...