नाशिकच्या महापौरपदी रंजना भानसींची बिनविरोध निवड

नाशिकच्या महापौरपदी रंजना भानसींची बिनविरोध निवड

  • Share this:

RANJANA BHANSI NASIK

14 मार्च : नाशिकच्या महापौरपदी भाजपच्या रंजना भानसी आणि उपमहापौरपदी प्रथमेश गीते यांची बिनविरोध निवड झाली. काँग्रेसच्या महापौरपदाच्या उमेदवार आशा तडवी यांना अर्ज मागे  घेतल्यामुळे नाशिकच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौरपदाची निवडणूक बिनविरोध झाली.

त्याचप्रकारे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपमहपौरपदाच्या उमेदवार सुषमा पगार यांनीही निवडणुकीतून माघार घेतल्याने भाजपच्या प्रथमेश गीते यांची उपमहौरपदी बिनविरोध निवड झाली.

महापौरपदी रंजना भानसी बिनविरोध विराजमान झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. ‘रामायण’ या महापौर बंगल्यावर भाजपचा झेंडा फडकावला आहे.

महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकत, गेल्या 27 वर्षांच्या इतिहासात प्रथमच स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. भाजपला नाशिक महापालिकेत 122 पैकी 66 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे नाशिक महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौरपदाची निवडणूक बिनविरोध आणि शांततेत पार पडली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 14, 2017, 12:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading