नाशिकमध्ये धुळवडीचा उत्सव, दाजिबा विराची मिरवणूक पडली पार

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 13, 2017 06:37 PM IST

नाशिकमध्ये धुळवडीचा उत्सव, दाजिबा विराची मिरवणूक पडली पार

nashik_dajiba4प्रशांत बाग,नाशिक

13 मार्च : राज्यभरात आज धुळवडीचा उत्सव साजरा केला जातो आहे.सर्वत्र आज धुळवडी निमित्त रंगांची उधळण असली तरी नाशिकमध्ये मात्र धुळवडीच्या दिवशी विरांना नाचवण्याची अनोखी परंपरा आहे.१५० वर्षांची ही परंपरा आजही कायम असून, धुळवडीनिमित्त नाशिकमध्ये विरांची मिरवणूक पार पडली.

राज्यभरात आज धुळवडी साजरी होत असली तरी नाशिकमध्ये मात्र आजचा दिवस विरांचा मानला जातो. वेगवेगळ्या देव देवत यांचं सोंग घेवून हे विर नाशिकच्या गोदावरीत आपल्या घरातल्या देवांना स्नान घालतात आणि परततात. या विरांमध्ये महत्वाच्या असलेल्या दाजिबा विराची मिरवणूक दुपारनंतर निघते. १५० वर्षांपासून गवळी घराण्याकडे या परंपरेचा मान आहे. शहरातून निघणारा हा दाजिबा विर नवसाला पावणारा असल्याचं मानलं जातं आणि त्यामुळेच त्याच्या दर्शनाला नाशिककर मोठी गर्दी करतात.

राज्यभरात आज रंग खेळले जात असले तरी नाशिकमध्ये मात्र रंगपंचमी साजरी केली जाते. आज मान असतो तो गंगेत आपले देव स्नानासाठी आणणाऱ्या या विरांचा. दाजिबा विराची परंपरा मोठी असल्यानं आणि याचा थाटही काही वेगळाच असल्यानं, दाजिबा विराच्या मिरवणुकीत नाशिककर मोठ्या हौसेनं सहभागी देखिल होताना दिसतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 13, 2017 06:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...