13 मार्च : आनंदासोबतच सप्तरंगांची उधळण करणारा सण म्हणजे होळी.बंजारा समाजातही होळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
बंजारा समाजाच्या प्रत्येक तांड्यावर होळीच्या काळात हा असा जलसा सुरू असतो. रात्रभर गाणं बजावणं सुरू असतं.बंजारा समाजात शिमग्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बंजारा समाजातील लग्नसोहळा, जन्मोत्सवातील अनेक सोहळे शिमग्यात साजरे केले जातात. नागर संस्कृतीतील लोकांसाठी होळी दोन दिवसांची असली तरी बंजारा समाजाची होळी महिनाभर सुरू असते.
आपल्या देशात अनेक समाज आणि संस्कृतींनी आपलं वेगळं अस्तित्व टिकवून ठेवलंय.बंजारा समाजानंही आपल्या संस्कृतीची गुंफण रंगोत्सव समजल्या जाणाऱ्या होळीभोवती गुंफत आपलं सांस्कृतिक वेगळेपण जपलंय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा