होळीच्या रंगात रंगली गतिमंद मुलं

होळीच्या रंगात रंगली गतिमंद मुलं

  • Share this:

GATIMAND HOLI

13 मार्च : औरंगाबादेतील आस्था गतिमंद मूकबधीर अनाथ मुलांनीही होळीचा आनंद साजरा केला.अास्था जनविकास या सामाजिक संस्थेनं आपली होळी या गतिमंद मुलांसोबत साजरी केली.अंगाला रंग लागताच बोलता आणि ऐकू न येणाऱ्या मुलांनी नाचून, रंग उधळून आपल्या भावना व्यक्त केल्या.

कोणत्याही भावना न समजणाऱ्या या मुलांच्या चेहऱ्यावर आज आनंद दिसत होता.या अनाथ मुलांनी रंगाच्या उधळणीनंतर पुरणपोळी खाऊन आनंद घेतला.

आपल्या आनंदात इतरांना सहभागी करून घेणं आपली मराठी संस्कृती असल्यानं आम्ही ही होळी साजरी केल्याचं संस्थेच्या संचालिका आरती जोशी यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 13, 2017, 10:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading