13 मार्च : दादर परिसरात काल मनसे चित्रपट कर्मचारी सेनेच्या वतीनं पायरेटेड सीडींची होळी करण्यात आली. मनसेची ही जुनी परंपरा त्यांनी या वर्षीही कायम ठेवलीय. असं असलं तरीही यावर्षी सीडींसोबतच इव्हीएम मशीनची प्रतिकृतीही जाळण्यात आली.
महापालिका आणि विधानसभा निवडणुकीसाठी वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन्समध्ये घोटाळा झाल्याचा आरोप वारंवार करण्यात आला होता.मनसेने ईव्हीएमची होळी करून आपला निषेध व्यक्त केलाय. या होळीसाठी अमेय खोपकर, संदीप देशपांडे, पुष्कर श्रोत्री, विजय पाटकर आदी पदाधिकारी आणि अभिनेते उपस्थित होते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा