मुंबईत होळीच्या उत्सवाला उधाण

मुंबईत होळीच्या उत्सवाला उधाण

  • Share this:

holi girgao

13 मार्च : मुंबईत कालपासून ठिकठिकाणी होळीचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातोय.गिरगावात नेहमीच प्रत्येक सण वेगळेपणाने साजरा करण्याची परंपरा आहे.गेली 100 वर्षांहून अधिक काळ गिरगावातील ताडवाडीत मोठ्या उत्साहाने होलिकोत्सवाचा सण साजरा केला जातो.

या निमित्ताने तिथे कोकणातील चालीरितींनुसार एका झाडाची विधीवत पूजा केली जाते.त्यानंतर या झाडाभोवतीच होळी बांधून ती पेटवण्यात येते.ही पारंपारिक होळी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गिरगावकर इथं जमतात.

यानिमित्ताने तिथे खास प्रदर्शनाचंही आयोजन करण्यात येतं. या प्रदर्शनात रंग, फुगे, रांगोळ्या, कलात्मक वस्तू आणि निरनिराळ्या खाद्यपदार्थांची रेलचेलही अनुभवायला मिळते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 13, 2017, 9:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading