राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत एकाच व्यासपीठावर

राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत एकाच व्यासपीठावर

  • Share this:

raju_shettiy_and_sadabhau12 मार्च : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत हे  गेल्या अनेक दिवसांच्या अबोल्यानंतर एकाच व्यासपीठावर आले. इस्लामपुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मेळाव्यात हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर आले.

दोघांनी हस्तांदोलन केलं मात्र एकमेकांच्या शेजारी बसूनही दोघं नेते बोलले नाहीत. त्यामुळे दोघांमधली दरी कमी झाली असली तरी अबोला कमी झालेला नाही हे यावरुन स्पष्ट झालंय.

जिल्हा परिषद निवडणुकीत सागर खोत यांना उमेदवारी दिल्यानं राजू शेट्टी नाराज झाले होते. या निवडणुकीत सागर खोत पराभूत झाले. त्यामुळए सदाभाऊ खोत राजू शेट्टींवर चांगलेच नाराज झाले. या पराभवानंतरही पुण्यात झालेल्या चिंतन बैठकीला सदाभाऊंनी दांडी मारली होती. आता हे दोन्ही नेते एका व्यासपीठावर आले पण दोघातला अबोला मात्र कायम आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 12, 2017, 7:59 PM IST

ताज्या बातम्या