S M L

शहीद जवान महादेव तुपारेंना अखेरचा निरोप

Sachin Salve | Updated On: Mar 12, 2017 05:36 PM IST

शहीद जवान महादेव तुपारेंना अखेरचा निरोप

12 मार्च : शहीद जवान महादेव तुपारे यांच्यावर आज(रविवारी) लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यातील माहिपाळगड येथील महादेव तुपारे यांना 8 मार्च रोजी सेवा बजावत असताना बर्फवृष्टीत वीरमरण आले. त्यांचं पार्थिव आज त्यांच्या गावी आणण्यात आलं.  यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करून त्याना आदराजंली वाहिली.

शहीद जवान अमर रहे च्या घोषणांनी यावेळी परिसर दणाणून गेला. साश्रूनयनांनी महादेव तुपारे यांना अखेरचा निरोप देण्यात आलाय. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी यावेळी शहीद तुपारेंच्या कुटुंबियांना शासकीय मदत जाहीर केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 12, 2017 05:36 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close