गोव्यात अपक्षांचा पाठिंबा भाजपला की काँग्रेसला? अपक्षच ठरणार किंग मेकर

गोव्यात अपक्षांचा पाठिंबा भाजपला की काँग्रेसला? अपक्षच ठरणार किंग मेकर

  • Share this:

BJP CONGRESS

12 मार्च : गोव्यात सत्तेस्थापनेची फारच इंटरेस्टिंग परिस्थिती निर्माण झालीय.भाजप सरकार स्थापनेसाठी जोरदार प्रयत्न करतंय. सगळ्यांचं लक्ष अपक्षांकडे आहे. आणि अपक्षच ठरणार आहेत किंग मेकर.

सध्याचं राजकीय गणित पाहूयात. महाराष्ट्र गोमंतक पक्षानं भाजपला पाठिंबा जाहीर केलाय. म्हणजे भाजपचे १३ आमदार आणि मगोपचे ३, झाले १६. आता भाजपला ५ आमदारांची गरज आहे.

गोवा फॉर्वर्ड भाजपला पाठिंबा देतं का हे पाहायचं. त्यांचे ३ आमदार आहेत. मग भाजपला फक्त २ अपक्षांची मदत लागेल.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मनोहर पर्रिकर सध्या गोव्यात आहेत. आणि  त्यांची इतर पक्षांशी बोलणी सुरू आहेत.

 

सत्तेची समीकरणं

शक्यता १ : भाजप १३ मगोप ३ गोवा फॉर्वर्ड ३ २ अपक्ष = २१

शक्यता २ : भाजप १३ मगोप ३ अपक्ष ५ = 21

शक्यता ३ : काँग्रेस १७ अपक्ष ४ = 21

 

आता वळूयात काँग्रेसकडे.काँग्रेसचे १७ आमदार आहेत. त्यांना आणखी ४ जागांची गरज आहे. गोव्यात काँग्रेसच्या आमदारांचीही आज बैठक झाली. दिग्विजय सिंगही या बैठकीला उपस्थित होते. आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेत्याची निवड होईल.आम्ही अपक्षांच्या संपर्कात आहोत. आम्हीच सरकार बनवू, असा आम्हाला विश्वास आहे, असं दिग्विजय म्हणाले.

भाजपकडे फक्त १३ आमदार आहेत, त्यांनी पराभव मान्य करावा आणि सरकार स्थापनेचा प्रयत्न करू नये, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. मात्र मनोहर पर्रिकरांचं त्यांनी कौतुक केलं. आपल्या राज्यासाठी ते केंद्रातलं पद सोडायला तयार आहेत.. त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो, असं सिंह म्हणाले.

एकूणच गोव्यात घोडाबाजाराला आता वेग आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 12, 2017, 3:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading