किरवलेंच्या हत्या प्रकरणी चौकशी समिती नेमणार - चंद्रकांत पाटील

किरवलेंच्या हत्या प्रकरणी चौकशी समिती नेमणार - चंद्रकांत पाटील

  • Share this:

 

kirwale

12 मार्च : ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक डॉ. कृष्णा किरवले यांच्या हत्येने सामाजिक आणि वैचारिक चळवळीची हानी झाली आहे. या प्रकरणाची सर्व स्तरावरून सखोल चौकशी करणार असून त्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात येईल. तसंच या प्रकरणामध्ये सरकारतर्फे चांगला वकीलही देण्यात येईल, असं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

पाटील यांनी डॉ. किरवले यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केलं. तसेच डॉ. किरवले यांच्या पत्नी श्रीमती कल्पना किरवले यांना सरकारच्या वतीने देण्यात येणारा चार लाख १२ हजार ५०० रुपयांचा धनादेशही देण्यात आला. पोलीस पुरावे गोळा करतायत, त्यांच्या जवळच्या लोकांनी तपास जलदगतीने होण्यासाठी पुरावे पोलिसांकडे द्यावेत, असं आावहनही पाटील यांनी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 12, 2017 03:01 PM IST

ताज्या बातम्या