प्रतिक्षा 'बाहुबली 2'च्या ट्रेलरची, 16मार्चला होणार ट्रेलर रिलीज

प्रतिक्षा 'बाहुबली 2'च्या ट्रेलरची, 16मार्चला होणार ट्रेलर रिलीज

  • Share this:

fde71bfb-dbbe-4d69-98b1-2723fd8c4ac8

12 मार्च : 'बाहुबली 2' सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहचलीये.सिनेमाचा ट्रेलर येत्या 16 मार्चला रिलीज होणारे आणि त्यासाठी सगळेच सज्ज झालेत.या सिनेमाचं एक नवीन पोस्टर लॉन्च झालय ज्यात ट्रेलरची रिलीज डेटही जाहीर करण्यात आलीये.

16 मार्चलाच चित्रपटाचा ट्रेलर ऑनलाइनसुद्धा लॅान्च करण्यात येणार आहे.

दिग्दर्शक राजामौली म्हणाले, 'बाहुबली: द बिगनिंग' सिनेमाचा ट्रेलरही याच तारखेला लॅान्च केलेला.' 'बाहुबली - 2' 28 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे.

2015मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बाहुबली: द बिगनिंग'चा 'बाहुबली-द कनक्ल्यूजन' हा सीक्वल आहे. चित्रपटामध्ये प्रभास, राणा दग्गुबाती, तमन्ना भाटिया आणि अनुष्का शेट्टी मुख्य भूमिकेमध्ये असतील.

'बाहुबली'च्या या पोस्टरमुळे तर प्रेक्षकांची अवस्था चातकासारखी झालीय. तरी त्यांना ट्रेलरसाठी 16 मार्चची वाट पहावीच लागणारे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 12, 2017 09:30 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading