विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला जंगलात सोडलं

विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला जंगलात सोडलं

  • Share this:

wagh

12 मार्च : बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर परिसरातील शिवारात विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या पिल्लाला वनविभागातल्या कर्मचाऱ्यांनी सुखरूप जंगलात सोडलं. गेल्या अनेक महिन्यापासून तिथे एक नर बिबट्या मादी आणि त्यांच्या तीन बछड्यांसह वावरत होता.

काल रात्री 7 वाजताच्या दरम्यान हे बिबट्याचं कुटुंब अजीसपूरजवळ असलेल्या अंभोरा फाट्याजवळच्या विहिरीजवळून जात असताना बिबट्याचं एक पिल्लू विहिरीत पडलं होतं.हे पिल्लू रात्री उशिरा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी काढून सुखरूप सरोवर परिसरातील जंगलात सोडले.

या बछड्याला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 12, 2017 01:18 PM IST

ताज्या बातम्या