लोकल ट्रेनवर फुगे फेकू नका,रेल्वे पोलिसांची जनजागृती

Sonali Deshpande | Updated On: Mar 12, 2017 12:19 PM IST

लोकल ट्रेनवर फुगे फेकू नका,रेल्वे पोलिसांची जनजागृती

12 मार्च : धुळवडीच्या वेळी मुंबईत दरवर्षी लोकल ट्रेनवर फुगे फेकण्याच्या घटना घडतात. हे लक्षात घेऊन रेल्वे पोलिसांनी काल रुळांच्या बाजूला असलेल्या झोपड्यांमध्ये जाऊन जनजागृती केली. उघड्यावर राहणाऱ्या लोकांशीही रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बळ यांनी संवाद साधला. तुम्ही तर फुगे फेकून नकाच, पण इतर कुणी असं करताना दिसलं तर त्याची माहिती पोलिसांना द्या, असं आवाहनही पोलिसांनी केलं.

मुलुंड ते सायन या पट्ट्यात खास करून ही मोहीम राबवण्यात आली. होळी आणि धुलिवंदनच्या दिवशी दरवर्षी मुंबईत लोकल ट्रेनवर काही असामाजिक तत्व रंगाचे फुगे तसेच गटारातील पाणी फेकून मारतात.यात अनेक प्रवाशी जखमी होतात.यावर्षी अश्या घटनांना आळा बसावा म्हणून रेल्वे पोलिसांकडून विशेष जनजागृती करण्यात येत आहे.रेल्वे सुरक्षा बल आणि आणि रेल्वे पोलीस यांनी संयुक्तपणे अशी जनजागृती केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 12, 2017 12:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close