घरात सुरू असलेल्या पार्टीत अंधाधुंद गोळीबार, 13 जखमी

घरात सुरू असलेल्या पार्टीत अंधाधुंद गोळीबार, 13 जखमी

या आधीही अमेरिकेत गोळीबारांच्या मोठ्या घटना घडलेल्या आहेत. हा हल्लेखोर कोण आहे आणि त्याचा नेमका उद्देश काय होता याचा तपास पोलीस करत आहेत.

  • Share this:

शिकागो 22 डिसेंबर : अमेरिकेत गोळीबाराच्या एका घटनेनं हे शहर हादरून गेलंय. शिकागो मधल्या उपनगरात एका घरात ही पार्टी रात्री सुरू होती. त्यावेळी एका माणसाने हा अंदाधुंद गोळीबार केला. त्या गोळीबारात तब्बल 13 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यातल्या 5 जणांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याची माहिती दिली जातेय. हल्लेखोराने तीन वेळा गोळीबार केला. जखमी झालेल्यांमध्ये 16 ते 48 वर्षांची माणसं असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केलीय. मात्र जखमींची नेमकी स्थिती आणि इतर तपशील अजुन कळालेला नाही.  या आधीही अमेरिकेत गोळीबारांच्या मोठ्या घटना घडलेल्या आहेत. हा हल्लेखोर कोण आहे आणि त्याचा नेमका उद्देश काय होता याचा तपास पोलीस करत आहेत.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 22, 2019, 11:58 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading