नवी मुंबई 12वी पेपरफुटी प्रकरणी चार जणांना अटक

नवी मुंबई 12वी पेपरफुटी प्रकरणी चार जणांना अटक

  • Share this:

paper

12 मार्च : नवी मुंबई 12 वी पेपरफुटी प्रकरणी आणखी 4 जणांना अटक करण्यात आलीय. विरारमधून ही कारवाई करण्यात आलीय. मुख्याध्यापक, एक हेडक्लार्क, आणि खासगी क्लास चालवणाऱ्या दोघांना अटक करण्यात आलंय. नवी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केलीय.

माऊंट मेरी या विरारमधल्या शाळेतील मुख्याध्यापक आनंद कामत, त्याच शाळेचा हेडक्लर्क गणेश राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पैसे घेऊन व्हॉट्सअपवरून पेपर लीक झाल्याची घटना घडल्यानंतर मोठ्या प्रमाणात चौकशी करायला सुरूवात झाली होती.

आतापर्यंतची ही दुसरी मोठी कारवाई आहे.अटक करण्यात आलेल्या चौघांनाही काल न्यायालयात हजर केलं असता त्यांना 18 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 12, 2017, 9:06 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading