Goa Election Results 2017 : गोव्यामध्ये त्रिशंकू अवस्था,काँग्रेस सर्वात मोठा पक्ष

  • Share this:

Party Seating 2017 Goa11 मार्च : गोव्यामध्ये निकालानंतर त्रिशंकू अवस्था निर्माण झालीय. काँग्रेस आणि भाजपमध्ये सत्तास्थापनेसाठी चुरस आहे. यासाठी राजकीय हालचालींना वेग आलाय. इथे काँग्रेस सर्वात मोठा पक्ष झालाय पण गोव्यात भाजपचं सरकार येणार, असा अमित शहांचा दावा आहे. यामुळेच भाजप इथे फोडाफोडीचं राजकारण करणार, असं बोललं जातंय.

गोव्यात पुन्हा एकदा काँग्रेसने कमबॅक केलं असलं तरी भाजपबद्दल असणाऱ्या नाराजीचा म्हणावा तसा फायदा काँग्रेसला उचलता आलेला नाही. यावेळी नव्याने उदयाला आलेल्या गोवा फॉरवर्ड पक्षानेही चारपैकी तीन जागा घेतल्यात. त्यामुळे गोव्याची सत्ता ठरवण्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि अपक्षांइतकीच याही पक्षाची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

भाजपा सरकारबद्दल असणारी नाराजी भाजपला भोवलीच त्याशिवाय संघाचे बंडखोर सुभाष वेलिंगकर आणि महाराष्ट्रावादी गोमंतक पक्षानेही उत्तर गोव्यात भाजपचं नुकसान केलंय. 2012 च्या निवडणुकीत भाजपला भरघोस यश देणारे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर फारसे उत्सुक नसतानाही त्यांना  पंतप्रधानांनी दिल्लीला बोलवलं आणि गोव्यात भाजप नेतृत्वहीन झाला.

पर्रीकरांच्या जागी आलेल्या मुख्यमंत्री पार्सेकरांची प्रशासनावर म्हणावी तशी पकड राहिली नाही पण हळूहळू भाजपच्या नेत्यांची जनतेशी असलेली नाळही तुटत गेली. याचा परिणाम भाजपाच्या पराभवात झाला. आता गोव्यात सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्यायत. अवघ्या 40 आमदारांच्या विधानसभेत गोवा फॉरवर्ड आणि अपक्षांचा भाव या सत्तेच्या राजकारणात चांगलाच वधारलाय .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 11, 2017, 9:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading