पराभवाचे धनी, राहुल गांधींचं आता पुढे काय ?

पराभवाचे धनी, राहुल गांधींचं आता पुढे काय ?

  • Share this:

11 मार्च : देशाच्या राजकारणात राहुल गांधीची गत सध्या एखाद्या फ्लॉप हिरोसारखी होऊन बसलीय. कारण राहुल गांधी सर्वाधिक प्रचारसभा घेतलेल्या उत्तरप्रदेशात काँग्रेसचं शब्दशः पानिपत झालंय. म्हणूनच राहुल गांधींच्या नेतृत्वातली काँग्रेसच्या पराभवाची मालिका खंडीत करायची असेल तर सोनियांनी आपलं पूत्रप्रेम थोडसं बाजुला ठेऊन आतातरी प्रियंका गांधींना राजकारणात सक्रिय करण्याची गरज निर्माण झालीय.rahul_up_pkg

उत्तरप्रदेशात काँग्रेसला पुनर्जीवन मिळावं, यासाठी काँग्रेस युवराज राहुल गांधींनी सपाच्या अखिलेश यादवांना सोबत घेऊन प्रचाराचा मोठा झंझावात केला. या दोघांनी मिळून 7 रोड शोज केले. एकट्या राहुल गांधींनी एकट्या उत्तर प्रदेशात तब्बल 45 प्रचारसभा घेतल्या. पण तरीही व्हायचं तेच झालं. इथंही राहुल गांधी पंतप्रधान मोदींचा झंझावात रोखू शकलेले नाहीत. लोकसभेपासून सुरू झालेली पराभवाची मालिका काही केल्या थांबायला तयार नाहीये.

राहुल गांधीच्या नेतृत्वात काँग्रेस आजपर्यंत फक्त पराभवच बघत आलीय. अपवाद फक्त कर्नाटक आणि पंजाबचा आहे. पण तिथल्या यशाचं श्रेय राहुल गांधींना नाहीतर स्थानिक नेतृत्वालाच द्यावं लागेल. उदाहरणार्थ पंजाबमधलं सगळ यश हे सर्वस्वी अरमिंदरसिंह याचंच म्हणावं लागेल.

priyanka_gandhi3याउलट जिथं जिथं राहुल गांधींनी प्रादेशिक पक्षांसोबत आघाड्या केल्यात तिथं तिथं काँग्रेस आणि मित्रपक्षाची  धुळधाणच झालीय. उदाहरणच द्यायचं झालं तर पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आता उत्तरप्रदेशचं देता येईल. म्हणूनच काँग्रेसला देशाच्या राजकारणात पुन्हा उभारी घ्यायची असेल तर एकतर राहुल गांधींना भाजपने रंगवलेली त्यांची 'पप्पूछाप' इमेज काहीही करून बदलावीच लागेल अन्यथा यापुढेही काँग्रेसची ही अशीच धुळधाण होत राहील.

राहुल गांधींना समजा हे शक्य होणार नसेल तर सोनिया गांधींनी किमान काँग्रेसच्या हितासाठी तरी आपलं पूत्रप्रेम थोडसं बाजूला ठेऊन सरळ प्रियांका गांधींना राजकारणात सक्रिय करावं. तर आणि तरच मोदींचा हा चौखूर उधळलेला हा वारू काबूत येऊ शकेल. कारण काँग्रेस ही एक विचारधारा आहे आणि ती विरोधी पक्षाच्या रुपात का होईना पण देशाच्या राजकारणात टिकलीच पाहिजे. बघुयात या पराभवातून तरी काँग्रेस नेतृत्व काही धडा घेतंय का...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 11, 2017, 9:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading