यूपीच्या जनतेचा कौल म्हणजे राममंदिराला पाठिंबा -मा.गो.वैद्य

  • Share this:

M G VAIDYA11 मार्च : उत्तर प्रदेशातील निवडणुकीत भाजपला जनतेन दिलेला कौल राममंदिर होण्यासाठी असलेला पाठिंबा आहे असं मत संघाचे माजी प्रवक्ते आणि संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी व्यक्त केलं.

अयोध्येत ज्या ठिकाणी राम मंदिर होते ते पाडून त्याठिकाणी मशिद बांधण्यात आली असं अलाहाबाद हायकोर्टाने मान्य केलंय. सर्वोच्च न्यायालयही हीच भूमिका कायम ठेवेल अशी आपल्याला आशा आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात योग्य वेळेत निर्णय दिला नाही तर केंद्रातील भाजपच्या नेतृत्वातील सरकारने राम मंदिरासाठी कायदा करावा असंही मा.गो.वैद्य म्हणाले.

तसंच गरिंबासाठी केंद्र सरकारने ज्या योजना आणल्या या सोबतच राममंदिर व्हावे यासाठी पुढाकार घेण्यासाठी हा कौल दिला आहे असंही वैद्य म्हणाले.

काँग्रेसनं गांधी घराण्यापासून स्वत:ला दूर करावे तेव्हाच तो पक्ष मोठा होऊ शकतो. काँग्रेस पक्ष मोठा होणे गरजेच कारण देशात दोन मोठे पक्ष असायला हवे त्यात काँग्रेस एक आहे असं वक्तव्यही वैद्य यांनी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 11, 2017, 8:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading