शिवरायांना अभिवादन करुन चंदू चव्हाण घरी पोहचला !

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 12, 2017 12:33 AM IST

शिवरायांना अभिवादन करुन चंदू चव्हाण घरी पोहचला !

chandu_chavan411 मार्च : पाकिस्तानच्या तावडीतून सुटलेला भारतीय सैन्याच्या ३७ राष्ट्रीय रायफल्स' चा जवान चंदू चव्हाण हा होळी सणाच्या तोंडावर आपल्या गावी परतलाय. फटाक्यांची आतषबाजी, भावनांचे फुटलेले बांध आणि भारत मातेचा जयघोष अशा भारवलेल्या वातावरणात  चंदू चव्हाणचं जोरदार स्वागत झालं. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हे स्वतः दिल्लीहून चंदूला घेऊन बोरविहीर गावात आले. चंदू घरी परत आल्याने संपूर्ण बोरविहीर गाव आनंदाने न्हाऊन निघाले होते.

धुळे शहरात चंदूचे धडाक्यात स्वागत करण्यात आले. यावेळी भारावून टाकणाऱ्या वातावरणात भारतीय लष्कराचा जवान चंदू चव्हाण यांचे आपल्या मायभूमीत स्वागत करण्यात आले. पाकिस्तानच्या तावडीतून सुखरूप मायदेशी परतलेल्या भारतीय सैन्यातील जवान चंदू बाबुलाल चव्हाण याला सोबत घेवून केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हे आज धुळ्यात आले. आल्यानंतर प्रथम चंदू चव्हाण यांनी  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच चंदूला भारतात परत आणणे शक्य झाल्याचं संरक्षण राज्य मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी यावेळी सांगितलं.

चंदू घरी परत आल्याचा आनंद त्याच्या आजोबांना शब्दात सांगता येत नव्हता. चंदू पाकिस्तानच्या ताब्यात असतांना त्याच्या आजीचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं होतं. तेव्हापासून आजीच्या अस्थी त्यांनी विसर्जित केल्या नव्हत्या.

अखेर चंदू आज आपल्या मायभूमीत परतला. आजीच्या अस्थी विसर्जित करणार आणी पुन्हा सीमेवर परतणार ही बोलकी प्रतिक्रिया चंदूची होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 11, 2017 08:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...