टायगर श्राॅफ लोकलने 'फिरला' कुणी नाही पाहिला

टायगर श्राॅफ लोकलने 'फिरला' कुणी नाही पाहिला

  • Share this:

tigar10 मार्च : बॉलिवूडचे अभिनेते सिनेमाच्या प्रमोशनसाठी आजकल निरनिराळे फंडे वापरतात. असाच एक फंडा टायगर श्रॉफ याने वापरला. टायगरने आज चक्क प्रमोशनसाठी लोकल ट्रेनचा प्रवास केला आणि तो व्हिडिओ टायगरने त्याच्या इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर केला.

टायगर सध्या त्याच्या आगामी 'मुन्ना मायकल' या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान तो वसईला गेला असता शूट संपल्यावर तो त्याच्या कारने वसई स्टेशनला पोहचला. तिथून वसई ते वांद्रे असा लोकलचा प्रवास त्याने जनरल डब्यात केला. प्रवास केला खरा पण तो मास्क घालून त्यामुळे मुंबईच्या पब्लिकने टायगर श्रॉफ ओळखलंच नाही.

मुन्ना मायकल या सिनेमात टायगर एका डान्सरची भूमिका बजावत आहे. सिनेमाची स्टोरी ही रस्त्यावर राहणाऱ्या मुलांची आहे, जी मुलं जगप्रसिद्ध डान्सर माइकल जॅक्सन याचे मोठे फॅन असतात. या सिनेमात टायगरच्या व्यतिरिक्त नवाजुद्दीन सिद्दीकी पाहण्यास मिळणार आहे. साबिर खान हे या सिनेमाचे दिगदर्शक आहेत. टायगरचा हा सिनेमा जुलैमध्ये रिलीज होईल असं समजतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 10, 2017 08:43 PM IST

ताज्या बातम्या