S M L

पुन्हा पेपराला फुटले पाय, कांदिवलीत बारावीचा बूक किपींगचा पेपर फुटला

Sachin Salve | Updated On: Mar 10, 2017 05:42 PM IST

पुन्हा पेपराला फुटले पाय, कांदिवलीत बारावीचा बूक किपींगचा पेपर फुटला

10 मार्च : बारावीच्या पेपर फुटीचं सत्र सुरूच आहे. मुंबईत कांदिवलीतील डॉ. टी.आर.नरवणे कॉलेजमध्ये बारावीचा बूक किपींग या विषयाचा पेपर फुटलाय. या प्रकरणी दोन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलंय.

राज्यात सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहे. पुण्यात व्हाॅटस्अॅपवर पेपर फुटण्याची घटना ताजी असताना मुंबईतही पेपर फुटी प्रकरण समोर आलंय. कांदिवलीतील डॉ. टी.आर.नरवणे कॉलेजमध्ये बूक किपींग या विषयाचा पेपर फुटलाय. परीक्षेला उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांच्या मोबाईल फोनमध्ये प्रश्नपत्रिका आढळून आल्यामुळे सर्व प्रकार समोर आलाय. या दोन्ही विद्यार्थ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून कांदिवली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 10, 2017 05:42 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close